Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक-ठाणे महामार्गावरील रस्ते समस्यांचा मंत्री भुसे यांनी घेतला आढावा

आठ दिवसांत परिणाम न दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

नाशिक - नाशिक पासून ठाणेपर्यंत ट्रॅफिक आणि रस्ते समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज मंत्री दादाजी भुसे यांच्

चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात
मराठी पत्रकार परिषदेच्या 14 पदाधिकार्‍यांची अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती

नाशिक – नाशिक पासून ठाणेपर्यंत ट्रॅफिक आणि रस्ते समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज मंत्री दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीसाठी msrdc चे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन, आरटीओ आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत हा विलंब कसा टाळता येईल, प्रवाशांना कमीत कमीत त्रास कसा होईल, याबबात नियोजन करण्यात आले. यासाठी वडपे ते ठाणेपर्यंत 23 किमी आणि नाशिक ते वडपेपर्यंतच्या 97 किमीच्या रस्त्याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजवणे, पुन्हा खड्डे  होणार नाही याची काळजी घेणे, पूलांची चालू कामे लवकर मार्गी लावणे, या प्रश्नांबाबतदेखील चर्चा झाली. 

आसनगाव रेल्वे पूलाचे काम प्रलंबित असून, त्यासाही आणखी 3 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने अस्तित्वात असलेल्या पुलाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय झाला. तसेच जिंदाल कंपनीजवळील फ्लायओवरचे काम, परिवार गार्डनजवळील पूल, इगतपुरी जवळील समृद्धी महामार्गाकडे जाणारा रस्ता, याबाबतही आजचया बैठकीत चर्चा झाली असून, लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्रलंबित पूलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून याठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही. याची काळजी घेणे. जड वाहनांना शहरात येणे-जाणे यासाठी वेळेचे बंधन लागू करण्यात आले आहे. ठाणेपासून वडपेपर्यंत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला 170 पोलिस मित्र देण्यात आले असून, त्यांना प्रभावी काम करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजे. जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेनमध्ये, लाहक वाहनांसाठी पहिली लेन खुली ठेवणे, याची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, येत्या 8 दिवसांत फील्डवर याचे परिणाम दिसून आले पाहिजे असे आदेशदेखील देण्यात आले आहेत. 

आठ दिवसांत याचे प्रभावी परिणाम दिसून आले नाही. तर, त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. ट्रॅफिक आणि रस्ते समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर पर्यटन करत असून, यासाठी नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी अशी विनंती मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

COMMENTS