Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज जिजाऊ जन्मस्थळावर उसळणार लाखो जिजाऊ भक्तांचा जन सागर 

जिजाऊ सृष्टी वर पुरुषोत्तम खेडेकर करणार मार्गदर्शन

सिंदखेड राजा - राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी देश विदेशातून लाखो जिजाऊ भक्त जिजाऊ ना अभिवादन करण्यासाठी येणार असून जिजाऊ भक्तांच्या सोय

पेशवेकालीन बालाजी मंदिराचा होणार जीर्णोध्दार ; नगर अर्बन बँक चौकात भूमिपूजन उत्साहात
विधानपरिषदेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप
अभियंत्याने मुंडन करून ऊर्जामंत्र्यांचा निषेध

सिंदखेड राजा – राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी देश विदेशातून लाखो जिजाऊ भक्त जिजाऊ ना अभिवादन करण्यासाठी येणार असून जिजाऊ भक्तांच्या सोयी साठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे . १२ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदय समयी मांसाहेबांची महापूजा होणार आहे.मराठा सेवा संघ,जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या वतीने ही महापूजा केली जाते.त्याच बरोबर राज्यभरातील जाधव वंशज देखील येथे येऊन जिजाऊ चरणी नतमस्तक होतात. दरम्यान,मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टी येथे विविध कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले असून येथील तयारी जोरात सुरू असल्याचे जिजाऊ जन्मोत्सव समितीचे समन्वयक सुभाष कोल्हे यांनी सांगितले.दुसरीकडे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा अर्थात जिजाऊ मासाहेब यांचे जन्मस्थळ आकर्षक पद्धतीने सजविले जात आहे.

 महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालय मुंबई यांनी आयोजीत केलेला जिजाऊ गाथा हा कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रसिध्द कलावंत सहभागी होणार आहे. १२ जानेवारी रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता जन्मस्थळ राजवाडा येथे मराठा सेवा संघाच्या प्रमुख जोडप्यासह महापुजा संपन्न होईल व त्यानंतर सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी सोहळा जन्मस्थळ राजवाडा ते जिजाऊ सृष्टी येथुन भव्य पालखीसह निघून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंडयांचा सहभाग असेल व सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहन संपन्न होईल व सकाळी ९ ते ११ शाहीराचे पोवाडे या सत्रामध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहीर आपल्या संचासह पोवाडे सादर करतील.सकाळी ११

ते १.३० पर्यंत जिजाऊ सृष्टी हॉल येथे नवोदित पक्ते, नवोदित कलाकार यांचा सांस्कृतीक कार्यक्रम वेगवेगळ्या कामगिरी केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार प्रकाशन सोहळा व नोंदणी केलेल्या जोडप्यांचा सामुहिक शिवविवाह सोहळा संपन्न होईल मुख्य कार्यक्रम दुपारी २ ते ६ ये वेळी येथे संपन्न होईल. हा कार्यक्रम शिवश्री ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार,मराठा सेवा संघाचे व ३२ कक्षांचे केंद्रीय कार्यकारीणीचे प्रमुख पदाधिकारी व राज्य कार्यकारीणीचे प्रमुख पदाधिकारी विहीत सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. समावेश असेल.या कार्यक्रमामध्ये मराठा सेवा संघाचे सर्वोच्च पुरस्कार, मराठा विश्व भुषण पुरस्कार, मराठा क्रिडा भुषण पुरस्कार,सम्मानपूर्व प्रदान करण्यात येतील व शेवटी समारोपीय मार्गदर्शन ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांचे होणार आहे.जन्मोत्सव सोहळ्यासाठी ४०० बुक स्टॉल, १०० भोजन स्टॉल उभारण्यात आलेले आहेत.यामध्ये मराठा सेवा संघ व बहुजन विचारधारा असलेले वैचारीक प्रबोधनाचे साहित्य महामानवांचे पुतळे प्रतिमा इतर साहीत्य विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.वाहनतळ निर्मिती, हेलिपॅड निर्मिती, रस्ते ,वैद्यकीय पथक, सुरक्षारक्षक पथक,आपत्तकालीन पथक, नियंत्रण कक्ष,चौकशी कक्ष, आयोजन समिती, कार्यालय स्वच्छतागृहे ,भव्य विचारमंच उभारण्यात येत आहेत.शेतकरी बांधवांसाठी विठ्ठलराव विखे पाटील कृषी दालन उभारण्यात आले असून यामध्ये शेतकन्यांसाठी मार्गदर्शन केंद्र आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शेती अवजारे विविध बिजउत्पादक रासायनिक खते औषधे इत्यादी कंपन्या सहभागी होत असून याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक दालन सुध्दा उभारण्यात आलेला आहे.

 पोलिसांचा तगडा बंदोबस्त :- जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ जन्मोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.२ डीवायएसपी,१८पोलीस निरीक्षक,३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३८० पोलीस अंमलदार,५१ महिला पोलीस अंमलदार,११५ वाहतूक पोलीस अंमलदार,३० साधे वेशातील पोलीस कर्मचारी,२२ कॅमेरामॅन,२६ पोलीस जीप,२ आर.सी.पी तसेच अमरावती ग्रामीण, अकोला, यवतमाळ ,वाशिम या जिल्ह्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला त्यामध्ये २ उपविभागीय पोलीस अधिकारी,१२ पोलीस निरीक्षक ,५० सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक,३०० पोलीस अंमलदार ,१०० महिला पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे.बंदोबस्त अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात,बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांचा समावेश आहे.

COMMENTS