Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहाटे एकीकडे भक्तिसांगित दुसरीकडे दुधाचा काळा धंदा

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळ प्रकरणावरही पोलिसांनी धडक कारवाई केली. केमिकल व इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. यावेळी दुधात भेसळ कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक आरोपींनी करून दाखविले. आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन तेलासह अन्य पदार्थांचा भेसळीचे द्रावण तयार करण्यासाठी वापर केला जातो. समीर कमरुद्दीन शेख (वय ३०, रा. उंबरे, ता. राहुरी),आफताब कलीम शेख (वय २८, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (मु.पो. फक्राबाद, ता. जामखेड) यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी शेख यांनी भेसळीसाठीचे द्रावण तयार करून जामखेडला आणले होते. ते उबाळे यांच्या दूधसंकलन केंद्रात दुधात मिसळण्यात येत होते. पहाटे गावात भक्तीसंगीत लावण्यात येते भक्तिसंगीतात लोक मग्न असतात. मात्र दूसरी कडे हा काळा धंदा जोरात चालू असतो पोलिसांनी घटनास्थळावरून साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे. मात्र याप्रकरणात काही मोठे लोक धनदांडगे असून त्यांच्या नावांची चर्चा नागरिकांमधून होत आहे; मात्र पोलीस प्रशासनाने कसून चौकशी केली तर अनेक मोठे मासे गळाला लागतील अशी नागरिकांमधून चर्चा आहे.

शिक्षक कॉलनीतील धोकादायक विज लाईन थांबवा : नागरिकांचा उपोषणाचा इशारा
एकल महिलांनी सक्षमीकरणासाठी पुढे यावे : कुलकर्णी
हॉर्न वाजवल्याने मारहाण ; ६ जणांवर गुन्हा 

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळ प्रकरणावरही पोलिसांनी धडक कारवाई केली. केमिकल व इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. यावेळी दुधात भेसळ कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक आरोपींनी करून दाखविले. आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन तेलासह अन्य पदार्थांचा भेसळीचे द्रावण तयार करण्यासाठी वापर केला जातो. समीर कमरुद्दीन शेख (वय ३०, रा. उंबरे, ता. राहुरी),आफताब कलीम शेख (वय २८, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (मु.पो. फक्राबाद, ता. जामखेड) यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी शेख यांनी भेसळीसाठीचे द्रावण तयार करून जामखेडला आणले होते. ते उबाळे यांच्या दूधसंकलन केंद्रात दुधात मिसळण्यात येत होते. पहाटे गावात भक्तीसंगीत लावण्यात येते भक्तिसंगीतात लोक मग्न असतात. मात्र दूसरी कडे हा काळा धंदा जोरात चालू असतो

पोलिसांनी घटनास्थळावरून साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे. मात्र याप्रकरणात काही मोठे लोक धनदांडगे असून त्यांच्या नावांची चर्चा नागरिकांमधून होत आहे; मात्र पोलीस प्रशासनाने कसून चौकशी केली तर अनेक मोठे मासे गळाला लागतील अशी नागरिकांमधून चर्चा आहे.

COMMENTS