खदानीच्या डबक्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खदानीच्या डबक्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू.

यवतमाळ मधील हृदयद्रावक घटना.

यवतमाळ  प्रतिनिधी-  यवतमाळ(Yavatmal) मध्ये मायलेकाचा  बुडून मृत्यू  झाल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घ

पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याने दरवाजा तोडून ठोकली धूम
उत्तरप्रदेशात पोलिस भरतीचा पेपर फुटला
स्टेट बँक ऑफ इंडियाला 47 कोटी 65 लाखांचा गंडा

यवतमाळ  प्रतिनिधी-  यवतमाळ(Yavatmal) मध्ये मायलेकाचा  बुडून मृत्यू  झाल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. शेतात कामासाठी हे आई आणि मुलगा यवतमाळमध्ये आले होते. खदाणीच्या डबक्यात कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगा गेले होते. अंघोळ करुन येतो, असं म्हणत मुलगा आईला सांगून खदाणीच्या डबक्यातील पाण्यात उतरला. मुलगा बुडतोय हे पाहून काय करावं आईला सुचले नाही. मुलाला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी घेतली. पण मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना आईचाही बुडून मृत्यू झाला. रुपाली शिंदे(Rupali Shinde) आणि भोला असे मृत मायलेकाचे नाव आहे.

COMMENTS