पुणे प्रतिनिधी - कोथरूड भागात अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आलेल्या दोघांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 1 हजार रुपय

पुणे प्रतिनिधी – कोथरूड भागात अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आलेल्या दोघांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 1 हजार रुपयाचे 6 ग्रॅम 750 मिली मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली आहे.रवि मोहनिंसग राठोड उर्फ बिल्ला ( वय 36, रा. भूगाव, मूळगाव राजस्थान), आदित्य संदीप माण ( रा. बावधन, मूळगाव नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. शहरात अंमली पदार्थ तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. यानुसार कोथरूड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान हिल व्ह्यू सोसायटी भागात दोघेजण मेफेड्रॉन पावडर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजिनाथ चौधर, संजय दहिभाते यांना मिळाली होती.
COMMENTS