Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेईई मेन्स परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा केला गौरव

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षात राबवण्यात आलेल्या सुपर ५० उपक्रमातील जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्या

रक्ताच्या थारोळ्यात गरोदर महिला पडून जागीच खल्लास…| LOK News 24
विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपीठांना मुदतवाढ
तरूणीचा मृतदेह आढळला गोणीत

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षात राबवण्यात आलेल्या सुपर ५० उपक्रमातील जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी ॲडव्हान्स परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी कशा पद्धतीने तयारी करावी, परीक्षेला कमी दिवस शिल्लक असताना शेड्युल कसे तयार करावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स परीक्षेला सामोरे जातांना सुलभता यावी यासाठी उपस्थित प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या सॅम्पल टेस्ट घेण्यात याव्या अशा सूचना केल्या. आयआयटी मुंबई येथील माजी विद्यार्थी व उद्योजक नरेंद्र गोलिया यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नुकत्याच निकाल लागलेल्या जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २२ विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी फुल, पेन आणि चॉकलेट देऊन गौरव केला विद्यार्थ्यांनी देखील आम्ही जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चांगल्या पद्धतीने यश संपादन करू असे सांगितले, यावेळी उपशिक्षणाधिकारी उदय देवरे,  गट शिक्षण अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS