Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांची वाळूज औद्योगिक नगरीत भेट

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद येथे पर्यटनानिमित्त भगवंत खुबा, केंद्रीय राज्यमंत्री रसायने व खते नवीन करनक्षम उर्ज, हे सपत्नीक आले असता त्यांनी

औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
आरोग्य विभागात 2 हजार पदे भरणार
मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा संजय राऊत त्याला भाव देऊ नका

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद येथे पर्यटनानिमित्त भगवंत खुबा, केंद्रीय राज्यमंत्री रसायने व खते नवीन करनक्षम उर्ज, हे सपत्नीक आले असता त्यांनी वाळुजमहानगर मध्ये सदिच्छा भेट दिली यावेळी मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खुबा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्री पर्यटनानिमित्त औरंगाबाद आले होते. यावेळी त्यांनी वाळुजमहानगर येथे भेट देत व्यवसाया निमित्त तसेच नोकरीनिमित्त औद्योगिक वाळुज नगरीत स्थिरावलेल्या कर्नाटक राज्यातील बांधवांना कर्मभूमीशी आणि मातृभूमीशी एकसंध राहण्याचे आवाहन करत सुसंवाद साधला याप्रसंगी मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष केशवप्पा होनाळी, सचिव श्रीनिवास तेलंग, उपाध्यक्ष मोहम्मदसाब नदाफ, कोषाध्यक्ष गुरु चिंचोळी, साई रेड्डी, गिरीश कुमार, किरण कुलकर्णी, भारती राजन्नवर, भाग्यश्री तेलंग, कलावती होनाळी, नागम्मा चिंचोळी, अनिता रेड्डी, अर्चना रेड्डी, विनूता म्हैसूरमठ, ख्वाजावी नदाफ, राजेंद्र कोसणे, सचिन लोहार, राजेंद्र चौधरी आदींसह कर्नाटक राज्यातील कामगार, व्यावसायिक व उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS