Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची आज बैठक

शिवपाणंद रस्ते व शेत रस्तेच्या प्रलंबित प्रश्‍नाबाबत तहसीलदारांशी करणार चर्चा

शेवगाव तालुका ः राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली

राजगड पोलीस ठाण्यातील पोलीसाची गळफास लावून आत्महत्या l Lok News24
कृषी कायद्यावर स्थगिती असतांना आंदोलन कशासाठी ? : सर्वोच्च न्यायालय | DAINIK LOKMNTHAN
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद फोफावला का ? l पहा LokNews24

शेवगाव तालुका ः राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यासंदर्भात शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी शेतकर्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत तहसीलदारांशी देखील चर्चा करण्यात येणार आहे.
शेवगाव येथे तालुक्यातील रस्ते पीडित शेतकर्‍यांची महाबैठक 20 सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याचे प्रणेते शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी जाहीर केल्यानंतर शेवगाव कृती समितीने तालुक्यातील 100 ते 150 शेतकर्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत तशा आशयाचे पत्र तहसीलदार यांना दिले. व त्यांनीही त्या चर्चेस सकारात्मक भूमिका घेऊन शेतकर्‍याची चर्चा केली जाईल. असे आश्‍वासन दिले.
राज्यातील शेवटच्या शेतकर्‍याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आला असुन अनेक शेतजमिनी शेत रस्त्या अभावी पडीक पडत चालल्या असुन अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत असुन रस्त्याअभावी शेतकर्‍यांना कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली असुन अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकालापर्यंतचा शेतकर्‍यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी शिव पाणंद शेतरस्ता कृती समिती शेवगाव यांच्यावतीने शेवगावात रस्ते पीडित शेतकर्‍यांची बैठक व शेवगाव तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे तशा आशयाचं पत्र शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे प्रणेते शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसीलदार यांना शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळ तथा कृती समिती शेवगाव तालुक्याच्या वतीने पत्र देण्यात आले. यावेळी कृती समितीचे रामेश्‍वर उर्फ बंडू घुले, पत्रकार शहाराम आगळे, बाळासाहेब शिंदे, मधुकर पाटेकर,दादासाहेब बोडखे, सत्यनारायण जाधव, यांच्यासह उपस्थित पोपट हरदास,चंद्रभान गायकवाड, शिवाजी पोटफोडे, चंद्रभान घोरपडे, अर्जुन गायकवाड, भरत गोरे, रावसाहेब वावरे, ज्ञानेश्‍वर दौंड, दत्तात्रय रिंधे, परमेश्‍वर मिर्झे, संकेत बडे, श्रीकांत निकम, काकासाहेब हरदास,भाऊसाहेब वावरे, कानिफ सुसे,सुभाष बनकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी 20 सप्टेंबर रोजी होणार्‍या महा बैठकीस तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS