Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरूच

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण काँगे्रस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून धुसफूस सुरू अस

शंकरराव गायकवाड मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शाहू विद्यालयामध्ये गौरव
पुणे पोलिसांची जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी | LOKNews24
राहुरी तालुक्यात पावसासाठी साकडे

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण काँगे्रस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या वादामुळे नाना पटोले चर्चेसाठी असतील तर आम्ही चर्चेला जाणार नाही, अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे गटाने घेतली होती. त्यानंतर आता दक्षिण नागपूरच्या जागेवरून काँगे्रस आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस गल्लोगल्ली, घरोघरी पोहोचलेला पक्ष आहे. तर शिवसेनेचा इथे संघटन सुद्धा नाही. त्यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसलाच मिळायला हवा, अन्यथा काँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देतील आणि शिवसेनेच्या उमेदवारासाठी आम्ही बूथ सुद्धा लावणार नाही, मग त्यांनी मत घेऊन दाखवावे, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटप्याच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी रंगल्याचे चित्र आहे. दरम्यान, ज्या दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या जागावाटप्याच्या चर्चेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रस्सीखेच सुरू आहे, दक्षिण नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि संजय राऊत यांच्यावर प्रचंड नाराज दिसत आहे.

मविआची प्रकृती देखील चुंगली : चेन्नीथला
काँगे्रस आणि ठाकरे गटांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत असलेला पेच सुटण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे मधल्या काळात रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. मात्र आता त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडीची प्रकृती देखील चांगली असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.

COMMENTS