महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ देखील करण्य

मंडल आयोगाने कर्नाटकात मराठा ओबीसी आणि एसटी ठरवला; महाराष्ट्रात का नाही ? 
Ahmednagar : महाराष्ट्रातील शाळा व कॉलेज त्वरित सुरू करण्यात यावे
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. महापौर झाल्यापासून पेडणेकर यांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे पत्र अत्यंत अश्लिल भाषेत आहे, स्त्रीच्या प्रत्येक अंगाचा यात उल्लेख आहे. तसेच माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे घरच्यांना, मुलांना मारून टाकू, अशी भाषा पत्रात वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आणि पत्ता आहे. बाहेर पाकिटावर वेगळं नाव आणि पत्ता आहे. हे पत्र पनवेलहून पोस्ट करण्यात आले आहे.

COMMENTS