संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना सरकारने मदत करावी. राज्यात महिलांवरील अत्याचार व दूष
संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना सरकारने मदत करावी. राज्यात महिलांवरील अत्याचार व दूषित झालेले वातावरण कमी होऊन राज्यातील संकटे दूर होऊ दे तसेच देशात व राज्यात सर्वत्र बंधुभाव वाढीस लागून हा देश समर्थपणे चालावा अशी प्रार्थना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर ते बोलत होते. श्रींची स्थापनावेळी मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सौ कांचनताई थोरात, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, संशोधक व कॅन्सरतज्ञ प्रा. डॉ. हसमुख जैन आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात शुभेच्छा देताना म्हणाले की, श्री गणेश उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये मोठा उत्साहाने साजरा होतो आहे. गणेश उत्सव हा एक आनंदाचे पर्व आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाची आराधना करतो. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे .धरने भरली आहेत .काही ठिकाणी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे.
राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहे. भेदभाव वाढतो आहे. हे अत्यंत काळजीचे आहे. हे सर्व राज्यावरील संकटे दूर होऊन सर्वत्र बंधुभाव वाढीस लागला पाहिजे. सर्वांना आपुलकीने वागवले गेले पाहिजे. देशातील बंधुभाव आणि चांगले वातावरण असेच टिकून भारत देश समर्थपणे पुढे जावा आणि या चांगल्या वातावरणाची जगाने अनुकरण करावे असा आपला देश निर्माण व्हावा अशी प्रार्थना करताना राज्यावरील आलेले सर्व संकटे दूर व्हावी असे साकडेही त्यांनी श्री गणेशाला घातले.
तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, गणेश उत्सव हा काळ महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा होतो आहे .संगमनेर मध्येही सर्वत्र आनंदोत्सव आहे. बाजारपेठा भरलेल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. यावर्षी पाऊस पाणी असल्याने सर्व नागरिक आनंदी आहेत .हे आनंदी वातावरण असेच राहू दे असे सांगताना सर्वांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन केले. याप्रसंगी श्री गणेशाची आरती करून सुदर्शन निवासस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी सर्व थोरात कुटुंबीय उपस्थित होते.


WhatsApp Image 2024-09-07 at 3.46.10 PM (2).jpeg
904 KB
COMMENTS