Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय 79) यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासूंन कर्करो

जानाई प्रतिष्ठानने 140 कुटुंब उभे केले
शेतकर्‍यांना 25%  टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी-अनिल जगताप
कर्जत नगरपंचायत मधील लाभार्थ्यांना 50 लाखांच्या हप्त्यांचे वितरण

पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय 79) यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासूंन कर्करोगामुळे आजारी होत्या. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आयूका येथे ठेवण्यात आले होते. डॉ. मंगला नारळीकर यांना कॅन्सरमुळे आजारी होत्या. त्यातून त्या बर्‍या झाल्या होत्या. मात्र, हा आजार पुन्हा उफळल्याने त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली. पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून 1962 साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर 1964 साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. त्यांनी विद्यापीठातून पहिल्या येण्याचा बहुमान मिळवला. 1964 ते 1966 या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात सहायक संशोधक व त्या नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. तर 1967 ते 1969 मध्ये केंब्रिज विद्यापीठात देखील गणिताचे अध्यापन केले.

COMMENTS