Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाड हेल्थकेअर कंपनीत भीषण स्फोट

रायगड प्रतिनिधी - रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्

चोपड्यात महावीर जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन
मान्सूनवर ’अल निनो’चे सावट
निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

रायगड प्रतिनिधी – रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये या दुर्घटनेत चार कामगार दगावल्याचे सांगण्यात येत असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याचीही शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाड एमआयडीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये शुक्रवारी (3, नोव्हेंबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराला गॅसची लागण झाली असून चार जण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या मृत्यूंबाबत कंपनीने अधिकृत दुजोरा दिला नाही.

दुर्घटनेतील तीन जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रण आणण्याचे काम सुरू असून काही कामगार अडकल्याचीही भिती आहे. 

COMMENTS