सांगली प्रतिनिधी - सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र असलेले आणि भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत यांचे पार्थिवावर खान
सांगली प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र असलेले आणि भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत यांचे पार्थिवावर खानापूर गावच्या भगत यांच्या शेतात शासकीय, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नायब सुभेदार जयसिंग भगत अमर रहेच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. नायब सुभेदार जयसिंग भगत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक , मित्र परिवार, खानापूर घाटमाथ्यावरील हजारो लोक उपस्थित होते. तसेच सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सियाचीन येथे बॉर्डरवर कर्तव्यावर असताना प्रचंड हिमवर्षावामुळे जयसिंग भगत हे शहीद झाले आहेत. पहाटे लडाख हुन पुण्यात शहिद भगत यांचे पार्थिव विमानाने पोहचले,त्यानंतर सकाळी लष्कराच्या वाहनातून शहीद भगत यांच्या पार्थिव त्यांच्या खानापूर मध्ये पोहचले. शहीद जवान जयसिंग शंकरराव भगत यांच्या पार्थिवाची गावातून आधी अंत्ययात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा ग्रामस्थ देत आहेत. शासकीय इतमामात शहीद नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
COMMENTS