जामखेड ः जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील विवाहित महिला (वय 19) 12 एप्रिल रोजी जामखेड बसस्थानकातून बेपत्ता झाली आहे. बेपत्ता विवाहितेचे नाव संस्कृ

जामखेड ः जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील विवाहित महिला (वय 19) 12 एप्रिल रोजी जामखेड बसस्थानकातून बेपत्ता झाली आहे. बेपत्ता विवाहितेचे नाव संस्कृती युवराज काकडे आहे. संस्कृती जामखेड तालुक्यातील बोर्ले येथून निमगाव मायंबा (तालुका शिरूर जिल्हा बीड) येथे माहेरी सासरे बापुराव हौसराव काकडे यांच्याबरोबर यात्रेसाठी 10 एप्रिल रोजी गेली होती. यात्रा संपल्यानंतर 12 एप्रिल रोजी सासरी बोर्ले येथे येण्यासाठी निघाली होती. बरोबर सासरे बापुराव हौसराव काकडे होते. जामखेड बसस्थानकावर सासर बापुराव यांना फळे आणण्यासाठी पाठवले. सासरे फळे घेऊन परत आले असता सुन त्या ठिकाणी आढळून आली नाही. शोधाशोध घेतली पण संस्कृती काकडे बेपत्ता झाली आहे असे कळले. तेव्हा सासरे हौसराव बापुराव काकडे यांनी जामखेड पोलिसांना याबाबत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी संस्कृती हिचे युवराज बरोबर लग्न झाले होते. दोन वर्षातच जामखेड बसस्थानकातून बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना संतोष कोपनर तपास करत आहेत. बेपत्ता संस्कृती युवराज काकडे कोठे कोणाला आढळल्यास जामखेड पोलिस स्टेशन 02421-221033, पोलिस नाईक संतोष कोपनर मो नंबर 9552507599 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
COMMENTS