Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमठाणा गावच्या चेअरमन पदी बिनविरोध मारोती पांडुरंग कदम पांडे तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव शंकरराव पा. शिंदे

नायगाव प्रतिनीधी :- नायगाव तालुक्यातील सोमठाणा  सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली चेअरमन पदी पांडे तर व्हाईस चेअरमन पदावर पाटणुरे य

बार्शीत गौतमी पाटील चा कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला
आवास योजनेमुळे गरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती
सोलापूर रेल्वे विभागात राजभाषा हिंदी कार्यान्वयन समितीची बैठक उत्साहात

नायगाव प्रतिनीधी :- नायगाव तालुक्यातील सोमठाणा  सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली चेअरमन पदी पांडे तर व्हाईस चेअरमन पदावर पाटणुरे यांची निवड करण्यात आली .सदस्य पदी पांडुरंग हनुमंतराव पाटील कदम, मारोतराव चंद्रभान पाटील शिंदे,श्रीहरी नागोराव कदम, सुनील बाबुराव शिंदे ,प्रकाश संभाजीराव कदम, श्रीहरी माधवराव कदम, सुधाकर माधवराव कदम, आनंदा बळीराम कदम,रेश्माजी मोहनाजी शास्त्री, शामराव गायकवाड, व्यंकटी कमळे यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  राठोड यांनी काम पाहिले आहे. सदरील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतिशय तळमळीने सहकार्य माजी सरपंच साहेबराव पुंडलिकराव पाटील कदम, माजी सरपंच भानुदास जकोजी पाटील कदम, माजी चेअरमन बळीराम नागोजी पाटील कदम, माजी सभापती प्रा. मनोहर पवार विद्यमान सरपंच मारोतराव शंकरराव कदम  तथा ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील कदम, परमेश्वर पा.कदम , शहाजी पाटील कदम यांनी मेहनत घेतली. सर्वांचे स्वागत सरपंच मारोतराव कदम यांनी केले आहे.

COMMENTS