नांदेड ः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गुरूवारी भूकपांचे धक्के जाणवले. हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यात गुरूवारी सकाळी 6.08 मिनिटांनी भूकंपाचा
नांदेड ः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गुरूवारी भूकपांचे धक्के जाणवले. हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यात गुरूवारी सकाळी 6.08 मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी 4.5 असल्याचे सांगण्यात आले. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात येत आहे.
या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरे पडल्याची माहिती वसमतचे पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठविण्यात आले होते. या मुळे काही घरांना तडे गेले आहेत. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून जिवाच्या भीतीने नागरिक पळून घराबाहेर आले. हे धक्के 6.9 मिनिटांपासून 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत म्हणजेच 11 मिनिटे हे धक्के जाणवले. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नागरिक साखर झोपेत असतांना भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. तब्बल 11 मिनिटे धरणीकंप झाला. यामुळे अनेक घरांना तडे देखील गेले. हे धक्के नांदेड शहरासह हदगाव, नायगाव, अर्धापूर तालुक्यात बसले. हिंगोली जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. घरे अक्षरक्ष: हलू लागली होती. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ येथे सकाळी दोन वेळा भूकंपाचे हादरे बसले. पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनी पहिला धक्का, तर 6 वाजून 19 मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. येथील सिरळी गावात भूकंपामुळे काही घराच्या भिंतींना तडे गेले. 4.2 रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तसेच जीवित हानी झाली नसल्याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 15 किलोमीटरवर अंतरावर होता. परभणी जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणत्याही नुकसानीची नोंद नाही. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात असून 60 किलोमीटर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच नांदेड शहर आणि काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात 1/5 रिष्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.
हिंगोलीतील 710 गावांना भूकंपांचे धक्के – हिंगोली जिल्हयातील सर्वच जवळ 710 गावांमध्ये गुरुवारी (ता. 21) पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपचा धक्का बसला आहे. 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसर्या धक्कयाची 3.6 एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचार्यांना देण्यात आल्या आहेत.
COMMENTS