Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे

संगमनेर फेस्टिवलचा शानदार शुभारंभ; जादूच्या प्रयोगांना प्रेक्षकांची भरभरुन दाद

संगमनेर : कर्णकर्कश आणि आरोग्याला घातक असलेल्या डीजे संस्कृतीमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे. यावर तातडीने निर्बंध लावण्याची ग

इंग्रजी शिक्षणामुळे प्रवरेची जागतिक स्तरावर ओळख
शेतकऱ्यांच्या बांधावर अनोखं आंदोलन l पहा LokNews24
आमदार थोरात यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गावात प्रचार फेरी संपन्न
IMG-20240910-WA0415.jpg

संगमनेर : कर्णकर्कश आणि आरोग्याला घातक असलेल्या डीजे संस्कृतीमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे. यावर तातडीने निर्बंध लावण्याची गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी केले.

      या सोहळ्याचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संगमनेर फेस्टिवलचे प्रणेते आणि मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र वाकचौरे, स्वदेश उद्योग समूहाच्या संचालिका संगीता देशमाने, शारदा पतसंस्थेच्या चेअरमन सोनाली नावंदर, विजय पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन विशाल जाखडी उपस्थित होते. आमदार तांबे यांनी डीजे संस्कृतीवर कठोर शब्दांत टीका करतांना म्हटले की, आपण सण साजरे करत असताना डीजेवर कोणते गाणे वाजत आहे याचे देखील भान उरलेले नाही. राजस्थान युवक मंडळाने डीजे बंदीसाठी घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी समर्थन केले. संगमनेर फेस्टिवलच्या उपक्रमामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला आणखी उंची प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.  मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी शहराच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलीस महानिरीक्षकांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राजस्थान युवक मंडळाने सुरू केलेल्या डीजे आणि शार्पी लाईट्स बंदीच्या मोहिमेला संगमनेरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध जादूगार के.सी.सरकार यांनी आपल्या थक्क करणार्‍या जादूच्या प्रयोगांनी उपस्थितांची मनं जिंकली. आकर्षक संगीत आणि लाईट इफेक्ट्सच्या माध्यमातून सादर झालेला हा कार्यक्रम संगमनेरकरांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार इंदाणी यांनी, सूत्रसंचालन रमेश घोलप, रोहित मणियार आणि प्रतीक पोफळे यांनी तर, आनंद लाहोटी यांनी आभार मानले.

COMMENTS