Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारलं

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात मराठी माणसाला घर नाकारण्यात आल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. मुलुंडमध्ये असा अनुभव आपल्य

शहरातील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर
पोहायला गेलेल्या सरकारी डॉक्टरचा बुडून मृत्यू
सार्वजनिक बांधकाम विभागातील नियमबाह्य पदोन्नतीमधील गौडबंगाल l पहा LokNews24

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात मराठी माणसाला घर नाकारण्यात आल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. मुलुंडमध्ये असा अनुभव आपल्याला आल्याचं सांगत तृप्ती देवरूखकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला. मुलुंड वेस्टमध्ये ऑफिससाठी घर पाहायला गेल्यानंतर आपल्याला मराठी असल्याचं सांगत घर नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच तिथल्या लोकांनी आपला हात पकडला आणि पतीला धक्काबुक्की केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर सोसायटीच्या सचिवांनी माफी मागितली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद उफाळून आला आहे.

COMMENTS