Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून होणार सुरू

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदाद पाटील यांची माहिती

अमरावती : रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणार्‍या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व

30 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत उडी मारून केली आत्महत्या
ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ स्थगिती
वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’साठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत 

अमरावती : रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणार्‍या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरूवारी रिध्दपूर येथे दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी आज रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना श्रपाटील म्हणाले की, येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्यादृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्‍या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.

रिद्धपूर ही महानुभाव पंथासोबत मराठी भाषेचीही काशी – मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमुल्य आहे. त्यांच्या अमुल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिध्दपूर ठरली आहे. यामुळे रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. ’लीळाचरित्रा’सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

COMMENTS