Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पञकार परीषदेच्या बीड येथील विभागीय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – अनिल महाजन

बीड प्रतिनिधी - मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्या वतीने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवा

शेतकऱ्यांच्या बांधावर अनोखं आंदोलन l पहा LokNews24
डिजीक्लेममुळे शेतकर्‍यांचा फायदा होईल ः कृषीमंत्री तोमर
मंत्री चंद्रकांत पाटलांवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज

बीड प्रतिनिधी – मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्या वतीने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पञकाराचे विवीध प्रश्ना वर चर्चा हौणार असून मान्यवर वक्त्याचे विचार ऐकण्यास मिळणार आहेतषया मेळाव्यास मराठवाडा विभागातील पञकारानी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे अवाहण मराठी पञकार परीषदेचे राज्य जनसंपर्क प्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे .
 मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्या वतीने 4 जून 2023 रोजी एम.आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय बनो आंदोलनाचे नेते डॉ.विश्वंभर चौधरी,असिम सरोदे आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे सर्व मान्यवर उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सकाळी 9.30 वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल.यावेळी माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.यामध्ये पत्रकार भूषण पुरस्कार लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, कृषी भूषण पुरस्कार कल्याण कुलकर्णी यांना तर समाज भूषण पुरस्कार मनिषाताई तोकले यांना जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात येतील. यावेळी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांचे निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका या विषयावर व्याख्यानही होणार आहे.परिषदेच्या जिल्हा शाखेच्या पदाधिकारी यांचा  यावेळी सत्कार करण्यात येईल.दुपारच्या सत्रात असिम सरोदे *पत्रकार आणि कायदा* या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी 3 ते 4.30 या वेळेत समारोप होईल.आमदार संदीप क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बीड च्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ – मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री.अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे आदि उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीड  जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, कार्याध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे, उपाध्यक्ष रवी उबाळे,डिजिटल मिडिया परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाठ,कार्याध्यक्ष दिनकर शिंदे,उपाध्यक्ष संग्राम धन्वे,उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, उपाध्यक्ष विश्वंभर मुळे, परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष छगन मुळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हंगे सह आदी परिश्रम घेत आहेत. मराठवाडा विभागातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे

COMMENTS