जालना ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिल्यानंतर देखील मनोज जरांगे यांनी अधिसूचनेची त्वरित अंमलबजावणी करण
जालना ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिल्यानंतर देखील मनोज जरांगे यांनी अधिसूचनेची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आमरण उपोषण सुुरू केले आहे. त्यासोबतच मनोज जरांगे यांनी रविवारी माध्यमांशी बोलतांना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
सरकारने 20 तारखेला आरक्षण दिले तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन सुरू राहील असा स्पष्ट इशारा मनोज जारांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी नववा दिवस आहे. सकाळी वैद्यकीय पथकाने त्यांचा बीपी तपासला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी जरांगे म्हणाले, ’स’ग्या सोयर्याची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे. ज्यांची नोंद मिळाली त्या नोंदी आधारे सग्या सोयर्यांना आरक्षण द्यावे. 20, 21 तारखेला सग्या सोयर्याची अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. जर अंमलबजावणी केली नाही. सगे सोयर्याची भूमिका घेतली नाही तर लगेच पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे’’, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. कारण मराठे ओबीसीमध्येच आहेत. शंभर दोनशे लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल. सहा करोड मराठ्यांची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे. सरकारने 20 तारखेला आरक्षण दिले तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन सुरू राहील, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले. तसेच ’’अजित पवार यांनी अधिवेशनात सग्या सोयर्याबाबतही बहुमताने मत मांडावे. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण येऊ शकत नाही. ते 50 टक्क्यांच्या वर जाणार आहे. नव्या आरक्षणासाठी मोठ्या मोठ्या घराण्याचे ऐकावे लागेल. सरकार त्याला बळी पडत आहे असे म्हणता येणार नाही. ज्यांच्या नोंदी मिळल्या नाहीत. त्यांना नवे आरक्षण असेल तर तो गैरसमज काढून टाका. मराठे ओबीसीमध्ये आहेत. सगयासोयर्यांची अंमलबजावणी करा, असे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS