Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्या नगर शहरात रविवारी मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन

अहिल्यानगर -अहमदनगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोड येथे रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन केले

वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरण
ओपन’ साठी २० तर ‘ट्रायबल’ साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा
कर्तव्यावरील खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन !
ahilyanagar maratha samaj code of ...

अहिल्यानगर -अहमदनगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोड येथे रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती संमेलनाचे सुकाणू समितीचे समन्वयक उद्योजक श्री एन. बी. धुमाळ यांनी दिली.
या संमेलनात ह. भ. प. भास्करगिरी महाराज हे उपस्थितांनाआचारसंहितेची शपथ देणार असून यावेळी ह .भ. प. जंगले महाराज शास्त्री व ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, पद्मश्री पोपटराव पवार,आ. संग्राम भैया जगताप आ.शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम अहिल्यानगरच्या सुकाणू समितीने मराठ्यांच्या सर्व संघटना व मान्यवरांशी चर्चा करून लग्नाची आचारसंहिता तयार केली होती. त्याची अंमलबजावणी ३१ मे पासून सुरू केली त्याची दखल महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र व मीडिया यांनी  घेतली. याची अंमलबजावणी  मराठा समाज आणि इतर समाज बांधवांनी सुद्धा सुरू केली आहे.

ही आचारसंहिता अधिक व्यापक करून वीस कलमी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. यामध्ये 300 ते 500 लोकात विवाह सोहळा करावा, प्री-वेडिंग बंद करावे, लग्नात हुंडा घेऊ नये, डीजे लावून प्रदर्शन करण्यापेक्षा पारंपारिक वाद्य व लोक कलावंतांना संधी द्यावी असे अनेक मुद्दे या आचारसंहितेत घेण्यात आले आहेत. समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या संघटना, सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा संघटना, मराठा उद्योजक लॉबी, मराठा समाजातील वकील, डॉक्टर, इंजिनीयर, आर्किटेक्चर, सीए ,शिक्षण तज्ञ ,आजी-माजी प्राचार्य,उद्योजक, ज्येष्ठ पत्रकार, सोशल मीडियाचे प्रतिनिधी, युवक व युवती, विविध क्षेत्रातील समाजातील मान्यवर, शासकीय अधिकारी,शेतकरी यातील प्रत्येकी ११ पदाधिकाऱ्यांना प्राथमिक स्वरूपात शपथ दिली जाणार आहे. यामध्ये प्रामाणिकपणे सहभागी होणाऱ्या निमंत्रण व्यक्तींनी  एन. बी. धुमाळ, 9423162548 यांच्याशी संपर्क साधावा,असे  आवाहन सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे,कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे,प्राचार्य खासेराव शितोळे,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजी. सुरेश  इथापे व सुकाणू समितीने केले आहे.

COMMENTS