Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू नसून घातपातच

ग्रामस्थांचा आरोप ;कारवाईसाठी पुणे-नाशिक मार्गावर केला रास्ता रोको

संगमनेर ः संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे 17 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारासशेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन स

अयोध्येत भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

संगमनेर ः संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे 17 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारासशेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. हा अकस्मात मृत्यूचा प्रकार नसून घातपाताचा असल्याचा संशय ग्रामस्थांना असल्याने याप्रकरणी पुढे कोणताही तपास न झाल्याने, चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी यासाठी बुधवारी (दि.29 मे) नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसातील टोल नाक्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
6 जून पर्यंत पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करत संबंधितांवर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत, दोन बालकांच्या मृत्युप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई झाली नाही तर पुढच्या आंदोलन पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर केले जाईल असा इशारा आंदोलकांच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला. आंदोलकांचा यावेळी पोलीस प्रशासनावर रोष दिसून आला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांनी आंदोलकांना चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. ग्रामस्थांच्यावतीने यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांसह पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन चौकशीची करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत अनेकवेळा तालुका पोलीस स्टेशन व डीवायएसपी कार्यालयातील संबंधीत अधिकार्‍यांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करूनही आश्‍वासनापलीकडे संबंधितांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला मंगळवार पर्यंतची मुदत देण्यात आली मात्र पोलिसांकडून कोणते कारवाई केली न गेल्याने बुधवारी टोल नाक्यावर ग्रामस्थांनी तासभर आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे टोल नाक्यावर महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेले दोघे भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिकत होते. यातील प्रणव हा तिसरीत तर रितेश हा पाचवीत होता. यांच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे आई शेती करून या दोघांचा सांभाळ करत होती. मात्र मुलांच्या मृत्यू मागे वेगळेच कारणे असण्याची चर्चा सुरू असल्याने याप्रकरणी पोलीस यंत्रणेने बारकाईने चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती.

COMMENTS