Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाच्या मोफत बियाण्यापासून लोहा तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकरी वंचीत

तालुका़ कृषी अधिकार्‍यासह सर्वाची चौकशी करुन कारवाई करा-सुरेश पाटील हिलाल

लोहा प्रतिनिधी - शासनाच्या मोफत बि-बियाणापासुन लोहा तालुक्यातील अनेक गोर गरीब शेतकरी बांधव वंचीत राहीले असुन लोहा तालुका कृषी अधिकारी बनसोडे, मं

पत्नीला मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बनवले घरजावई | LOKNews24
अकरा महिन्याच्या वेदीला दिले 16 कोटीचे इंजेक्शन
मंत्र्यांवर आंदोलनाची वेळ, हे दुर्दैव ; प्रा. शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका ; 26 जूनला चक्का जाम जाहीर

लोहा प्रतिनिधी – शासनाच्या मोफत बि-बियाणापासुन लोहा तालुक्यातील अनेक गोर गरीब शेतकरी बांधव वंचीत राहीले असुन लोहा तालुका कृषी अधिकारी बनसोडे, मंडळ कृषी  अधिकारी पोटपेलवार, कृषी पर्यवेक्षक व सर्व कृषी सहाय्यकांची  जिल्हा कृषी अधिक्षक नांदेड व  जिल्हाधिकारी नांदेड यांनी तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर  कारवाई करावी अशी मागणी शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा तालुकाप्रमुख  सुरेश पाटील हिलाल यांनी निवदनाव्दारे केली  आहे .
पुढे निवेदनात शिवसेना लोहा तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी असे नमुद केले की शासनाच्या वतीने दरवर्षी खरीप हंगामात तालुक्यातील गोर-गरीब अल्पभूधारक  शेतक-यांसाठी सोयाबीन,मुग,उडीद,तूर ज्वारी आदी बि-बियाने वाटप  करण्यात येते तसेच आत्महत्याग्रस्त शेतक-यांना ही शासनाच्या वतीने बी-बियाणे खते,औषधी मिळतात पंरतू लोहा तालुक्यत  कुंपनानेच शेत खाले  या म्हणीप्रमाणे लोहा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केले शासनाच्या मोफत आलेले  बी बियाणे कुणालाच गरजू शेतक-यांना न देता आपल्या मर्जीतील दोनचार शेतक-यांना दिले आहे बाकी हाडेल हाफ केले आहे. त्यामुळे लोहा तालुक्यातील अनेक गरजू गोरगरीब शेतकरी हे वंचीत राहिले आहेत. लोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार म्हणजे आंधळ दळतय कुत्र पिठ खातय या प्रमाणे चालला आहे. तालुका कृषी अधिकारी बनसोडे,मंडळ कृषी  अधिकारी पोटपेलवार,यांच्या सहित सर्व कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक हे मुख्यायली राहत नाहीत शेतक-यांचे काम करीत नाहीत ख-या शेतक-यांना शासकीय योजना देत नाहीत यंदा 2023 मध्ये खरीप हंगामात अनेक शेतक-यांना बि बियानापासुन वंचीत ठेवले आहे.  तेव्हा लोहा  तालुका कृषी अधिकारी बनसोडे व मंडळ कृषी अधिकारी पोटपेलवार यांच्या सहित सर्व कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांची खातेनिहाय चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची करावाई करावी व लोहा तालुक्यतील शेतक-यांना बि-बियाणे खते ,औषधी वाटप करावे अन्यथा शिवसेनेच्याा वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना लोहा  तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी दिला आहे.

COMMENTS