Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांत्रिक 11 लाख घेवून झाला पसार

मुंबई/प्रतिनिधी ःपैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार मुंबईतल्या जोगेश्‍वरीमध्ये समोर आला आहे. जोगेश्‍वरी पश्‍चिमेला राहणार्‍या एका

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर
महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय
संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!

मुंबई/प्रतिनिधी ःपैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार मुंबईतल्या जोगेश्‍वरीमध्ये समोर आला आहे. जोगेश्‍वरी पश्‍चिमेला राहणार्‍या एका तरुणाची पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर शेख या जोगेश्‍वरीतील ऑटो मेकॅनिकला त्याचा मित्र शमशुददीन शेखने फोन करून पैसे डबल करून देणार्‍या व्यक्तीची माहिती दिली. मात्र पैसे डबल करण्याच्या बहाण्याने या मांत्रिकाने अत्तर, टाकून अंधार केल्यानंतर 11 लाख रूपये घेवून पोबारा केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS