पुणे ः राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लाखोंच्या सभा घेत सरकारला धडकी भरवली असतांना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे अज
पुणे ः राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लाखोंच्या सभा घेत सरकारला धडकी भरवली असतांना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे अजून लहान असून, त्यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा. आरक्षण कसे मिळते? भारतीय घटनेत काय तरतुदी आहेत त्यांच्याविषयी वाचावं. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा समाज ओबीसींसे आरक्षण कधीही घेणार नाही असे राणे यांनी म्हटले आहे.त्यामुळे मराठा समाजविरूद्ध राणे असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. राणे पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना राणे म्हणाले की, कुठल्याही नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावून देण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा आमच्या समितीने जेव्हा आरक्षण दिले होते तेव्हा कुणाचे आरक्षण काढून द्या असे आम्ही म्हणालो नाही, मात्र कुणाचेही आरक्षण काढून मराठ्यांना द्यावे या मताचा मी नाही. मराठा आरक्षणावरुन सध्या मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातल्या तिसर्या टप्प्यातल्या सभाही आता लवकरच सुरु होतील. याबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी मनोज जरांगे पाटील लहान आहेत अजून असे म्हटले आहे. मराठा आरक्षणावर मी काही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. कारण मराठ्यांना आरक्षण यावर प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे. मी मगाशीही स्पष्ट केले आता पु्न्हा सांगतो, कुणाचेही आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता 52 टक्क्यांच्या वर भारतीय घटनेच्या 15/4 प्रमाणे आरक्षण द्यावे. मागास आयोगाकडे पाठवावे, त्याचा सर्व्हे केला जावा. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिले जावे हे माझे मत आहे. दरम्यान, यावेळी राणे यांनी ठाकरे गटावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे गट आहे का? गट म्हणावा इतके तरी नेते आहेत का त्यांच्याकडे? तसेच तो नुसता आहेत त्या नेत्यांना शेतकर्यांच्या बांधावर जायला सांगेल, पैसे देणार नाही. मातोश्रीमध्ये फक्त वनवे आहे तिथे पैशांची आवक होते, पैसे बाहेर जात नाहीत. मी 39 वर्षे शिवसेनेत होतो मला सगळे माहीत आहे. असे म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
अॅड. प्रकाश आंबेडकरांना अटक करा ? – वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर जर दंगलीची माहिती लपवत असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे. कारण कुठल्या कालावधीत कुठल्या ठिकाणी दंगल होणार हे माहीत असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागतो. ते म्हणाले असे चालत नसते. प्रकाश आंबेडकरच नाही तर इतर कुणीही असे वक्तव्य केलं तर त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीच मी बोलतो आहे असे नाही. ज्यांना दंगल होणार याची माहिती आहे आणि ते तसे वक्तव्य करत आहेत त्यांच्याविषयी बोलतो आहे असेही राणे म्हणाले.
COMMENTS