Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर सेवा समितीच्या वतीने शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी जाहीरनामा

संगमनेर : संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी राजकारण विरहित एकत्र येऊन स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या वतीने व्हिजन 2.0 हा जाहीरनामा शुक्रवार

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे
राज ठाकरे यांना न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
Displaying WhatsApp Image 2025-05-05 at 5.49.06 PM.jpeg

संगमनेर : संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी राजकारण विरहित एकत्र येऊन स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या वतीने व्हिजन 2.0 हा जाहीरनामा शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वा.नाशिक पुणे रोड , मार्केट यार्ड व दिवटे किराणा समोर किराणा समोर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसिद्ध होणार असून यावेळी जाहीर सभा होणार आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे विकासातून वैभवशाली ठरले आहे. विकासाची ही परंपरा कायम ठेवण्याबरोबर मागील एक वर्षापासून संगमनेर अशांत करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी संगमनेर मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे.  संगमनेर 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षाची नियोजन घेऊन संगमनेर मधील 11257 नागरिकांच्या सूचना घेऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर 2.0 हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.

शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी  मार्केट यार्ड समोर नाशिक पुणे रोडवर दिवटे किराणा समोरील जागेवर सायंकाळी 5 वा. जनतेचा जाहीरनामा प्रसिद्धी व जाहीर सभेसाठी महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर सेवा समिती, सर्व संघटना बिगर राजकीय पदाधिकारी, सर्व सदस्य व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नाशिक पुणे रोडवर मार्केट कमिटी समोर होणाऱ्या जनतेच्या जाहीरनामा प्रसिद्धी व जाहीर सभेसाठी  संगमनेर शहरातील सर्व नागरिक ,युवक, महिला, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS