अकोले प्रतिनिधी ः प्राथमिक शिक्षिका म्हणून सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यातून मंदा आरोटे-सोनवणे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत विस्तार अधिकारी

अकोले प्रतिनिधी ः प्राथमिक शिक्षिका म्हणून सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यातून मंदा आरोटे-सोनवणे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत विस्तार अधिकारी पदापर्यंत मजल घेतली. जिल्ह्यातील विविध शाळांत त्यांनी उल्लेखनीय काम केले. मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य शिक्षकांसाठी, समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन नगर विकास विभागाचे उपसचिव विजयराव चौधरी यांनी केले.
श्रीमती मंदा मारुती आरोटे-सोनवणे यांचा सेवानिवृत्ती समारंभानिमित्त विजयराव चौधरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ मंगला हांडे, रामदास सोनवणे, रामनाथ आरोटे, शालेय पोषण आहार अधीक्षक अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, अनिल गायकवाड सविता कचरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विजयराव चौधरी म्हणाले की,अकोले तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांत उल्लेखनीय काम सुरू आहे. मंदा आरोटे यांच्यासारख्या शिक्षकांनी तालुक्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले उपक्रम हे शिक्षकांसाठी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा जेष्ठ विधिज्ञा सौ. मंगला हांडे यांनी मंदा आरोटे व रामदास सोनवणे या दोघांच्याही कार्यावर प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे कार्य सोनवणे दांपत्य पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. शिल्पा धुमाळ, अरुणमहाराज फरगडे,अरविंद कुमावत, बाळासाहेब दोरगे यांचीही भाषणे झाली. अकोले बीटातील सर्व शिक्षक व सोनवणे परिवार यांच्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय भाऊसाहेब कासार यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन सुनीता देशमुख यांनी केले. अनुराधा नेहे यांनी सूत्रसंचालन तर सतीश वैद्य यांनी आभार मानले.
COMMENTS