Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍यावेळी मानापमान नाट्य

व्यासपीठावर जागा न दिल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

मुंबई ः महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौर्‍यावेळीच मानापमान नाट्य रंगतांन

25 टक्के अग्रीम पिक विमा तात्काळ मंजुर करुन शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करा -शिवाजी ठोंबरे
महाराष्ट्राची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू : आ. विखेंचे भाष्य
क्रूरतेचा कळस : १४ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार…

मुंबई ः महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौर्‍यावेळीच मानापमान नाट्य रंगतांना दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर जागा न देता आमदार, शहरप्रमुखांना तसेच इतर पदाधिकार्‍यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा दिला आहे. वर्षभरपूर्वी  अरविंद मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.  
एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली होती. सध्या अरविंद मोरे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेंचा प्रचार करत होते. मोदींच्या सभेत व्यासपीठावर जागा न दिल्याने अरविंद मोरे नाराज होते. अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आणि राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर निमंत्रण नसल्याने शहरप्रमुख पदाचा राजीनामा स्वीकारण्याची मुख्यमंत्र्यांना केली पत्राद्वारे विनंती केली. कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी व्यासपीठांवर निमंत्रित पदाधिकार्‍यांमध्ये जिल्हाप्रमुखांना निमंत्रण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीनाट्य रंगतांना दिसून येत आहे.

COMMENTS