Homeताज्या बातम्यादेश

योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली ः योगामध्ये अमर्याद शक्ती असून, प्रत्येकाने योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क

‘त्या’ ८ चित्त्यांचं नामकरणं; मोदींनी ठेवलं खास नाव !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौर्‍यावर
पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

नवी दिल्ली ः योगामध्ये अमर्याद शक्ती असून, प्रत्येकाने योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले आहे की, योग आपल्याला शांतता प्रदान करतो, ज्यामुळे आपल्याला जीवनातील आव्हानांचा शांतपणे आणि धैर्याने सामना करण्यास मदत होते.
आगामी योग दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान मोदी यांनी विविध योगासनांवर मार्गदर्शन करणारे आणि योगासनांच्या फायद्यांविषयी माहिती देणार्‍या व्हिडिओंची एक मालिका सामायिक केली. आजपासून दहा दिवसांनी, जग दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करेल. एकता आणि सामंजस्य साजरे करणारी ही एक कालातीत प्रथा आहे. योगाने सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन, समग्र कल्याणाच्या शोधात जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणले आहे. यावर्षीच्या योग दिनाच्या दृष्टीने, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची आणि इतरांनाही त्याचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा सांगणे आवश्यक आहे. योग शांतता प्रदान करतो, ज्यामुळे आपल्याला जीवनातील आव्हानांचा शांतपणे आणि धैर्याने सामना करण्यास मदत होते. योग दिन जवळ येत असताना, मी विविध योगासनांवर मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या फायद्यांविषयी माहिती देणारे व्हिडिओ सामायिक करत आहे. मला आशा आहे की हे सर्वांना नियमित योगाभ्यास करण्यास प्रेरणादायी ठरेल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

COMMENTS