कोपरगाव शहर ः मुलींनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घेत चांगला अभ्यास करून शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव लौकीक करावे असे प्रतिपादन
कोपरगाव शहर ः मुलींनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घेत चांगला अभ्यास करून शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव लौकीक करावे असे प्रतिपादन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, लतिका म्हस्के व म्हस्के कुटूंबीय यांच्या वतीने शालेयपयोगी वस्तूंचे वाटप प्रसंगी बोलतांना व्यक्त केले. चंद्रशेखर म्हस्के यांच्या संकल्पनेतुन गेल्या 6 वर्षांपासून वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळत हा उपक्रम सुरू असून या वर्षी देखील शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 3 या शाळेतील सर्वच विद्यार्थिनींना प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना 720 वह्यांचे व स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणार्या पुस्तकांचा संच वाटप करत आमदार काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, लतिका म्हस्के, रुपाली भोकरे, गायक ताई नगरपालिका शाळा क्रमांक 3 च्या मुख्याध्यापिका रजनीताई खैरनार आदी सह सर्व शिक्षक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS