श्रीरामपूर ः वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर यांचे वाचन संस्कृतीचे कार्य प्रेरणादायी असून या प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध
श्रीरामपूर ः वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर यांचे वाचन संस्कृतीचे कार्य प्रेरणादायी असून या प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा नुकताच प्रकाशित झालेला’ ’माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ हा ग्रामीण विनोदी कथासंग्रह जीवनातील प्रसंगाचे मार्मिक, वास्तव दर्शन घडवितो, असे मत कडा येथील संघर्ष वाहन चालक, मालक संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव व वाचनग्रुपचे मार्गदर्शक सुभाषराव देशमुख यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर येथील डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित पुस्तकाचे वितरण आणि परिसंवाद प्रसंगी सुभाषराव देशमुख बोलत होते. यावेळी मॉर्निंग ग्रुपचे एस.बी.आय. चे माजी बँक मॅनेजर दीपक किंबहुने, प्रा.गणेशराव पाटील, प्रा.गणेशराव रावळ आणि मित्र मंडळांना डॉ. उपाध्ये लिखित’ कुंभारवाड्यातील कविता, ग्रंथसंवाद, माकडांच्या हाती खिचडी पुस्तके भेट दिल्यानंतर ते या पुस्तकावर आणि विशेषतः कथासंग्रहाचे विश्लेषण करताना बोलत होते. कुंभारवाड्यातील कविता व माकडांच्या हाती शाळेची खिचडी ही दोन्ही पुस्तके पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाली तर ग्रंथसंवाद हा संदर्भग्रंथ श्रीरामपूर येथील मोहिनी शिवाजी काळे यांच्या आसरा प्रकाशनतर्फे नुकताच प्रकाशित झाला. पुस्तकांमुळे माणूस विचारसंपन्न आणि सुसंस्कृत बनतो, त्यामुळे वाचन संस्कृतीचा उपक्रम गावोगावी, अनेक ग्रुपमध्ये पुस्तकाचे वाटप व परिसंवाद ही काळाची गरज असल्याचे उपस्थित मित्र मंडळींनी मत व्यक्त करून ही पुस्तके म्हणजे घरातील लहानापासून थोरापर्यंत वाचली जातील असे वातावरण निर्माण होईल असे मत व्यक्त करून गणेश पाटीलसर यांनी डॉ. उपाध्ये व सुभाषराव देशमुख यांच्या कार्याला शुभेच्छा देत आभार मानले.
COMMENTS