Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन वर्षांत गुन्हेगारीवर मोठा लगाम; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई; २८७६ गुन्हे दाखल, २३९८ गुन्ह्यांची उकल

श्रीगोंदा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाई किती प्रभावी ठरू शकते, याचे उदाहरण श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या गेल्या तीन वर्षांतील कामगिरीतून दिसून येते. १३ ऑगस्ट २०२३ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत एकूण २८७६ गुन्हे दाखल केले, तर त्यापैकी २३९८ गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.  दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी विशेष मोहिम राबवत ७९३ गुन्हे दाखल केले. या कारवाईदरम्यान १ कोटी ११ लाख ४३ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार प्रकरणांमध्ये १५० गुन्हे दाखल करून १ कोटी ४ लाख ६६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय आर्म ॲक्ट अंतर्गत १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींबाबत २४७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २०६ व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या अंतर्गत ८६६१ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६७ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर १११ कारवाया करून ९७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने सातत्याने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक किरण शिंदे व श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

गोठ्यात हातभट्टी दारू काढणार्‍यावर पोलिसांची धाड; हजारो रुपयांचे साहित्य नष्ट
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक
टोमॅटोचे भाव कोसळले; लाल चिखल शेतकर्‍यांच्या नशिबी; कष्टांचे मोल न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर टाकला माल

श्रीगोंदा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाई किती प्रभावी ठरू शकते, याचे उदाहरण श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या गेल्या तीन वर्षांतील कामगिरीतून दिसून येते. १३ ऑगस्ट २०२३ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत एकूण २८७६ गुन्हे दाखल केले, तर त्यापैकी २३९८ गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी विशेष मोहिम राबवत ७९३ गुन्हे दाखल केले. या कारवाईदरम्यान १ कोटी ११ लाख ४३ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार प्रकरणांमध्ये १५० गुन्हे दाखल करून १ कोटी ४ लाख ६६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याशिवाय आर्म ॲक्ट अंतर्गत १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींबाबत २४७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २०६ व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या अंतर्गत ८६६१ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६७ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर १११ कारवाया करून ९७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने सातत्याने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक किरण शिंदे व श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

COMMENTS