Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध धंद्यांवर कर्जत पोलिसांची मोठी कारवाई

देशी विदेशी दारू जप्त, शेकडो लिटर रसायन कारवाईत केले नष्ट

कर्जत/प्रतिनिधीः कर्जत तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक अरुण पाटील यांनी स्वतः या कारवाईत सह

जीवनात प्रकाश निर्माण करणार्‍या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पदः सुपेकर
मद्यपी वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. सुजय विखे

कर्जत/प्रतिनिधीः कर्जत तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक अरुण पाटील यांनी स्वतः या कारवाईत सहभागी होवून विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून दारू तयार करण्याचे शेकडो लिटर रसायन कारवाईत नष्ट केले. या धडाकेबाज कारवाईचे तालुक्यातून स्वागत केले जात आहे.
याबाबतची सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिस निरीक्षक अरुण पाटील हे स्टाफसह कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील राशीन दुरक्षेत्रात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राशीन पोलिस दुरक्षेत्र हद्दीतील करपडी येथील हॉटेल वृंदावन येथे राज दळवी, खेड येथील हॉटेल आईसाहेब येथे स्वप्नील कांबळे तसेच येसवडी येथील हॉटेल संदिप येथे अविनाश सुद्रीक हे अवैधरित्या देशी-विदेशी दारुची विक्री करत आहेत. तसेच बारडगाव दगडी शिवारात अमोल पवार हा देखील गावठी हातभट्टीची दारु तयार करुन तिची अवैध विक्री करत आहे. माहीती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण पाटील यांनी तात्काळ आपल्या स्टाफसह तेथे जावून अचानकपणे दारू अड्ड्यांवर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी 22,500/- रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला. तर दुसर्‍या ठिकाणी मारलेल्या छाप्यात बारडगाव सुद्रीक येथे गावडी हातभट्टी तयार करण्याचे सुमारे 80,000/-रुपये किमतीचे 800 लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट केले. कर्जत पोलिसांच्या विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यामुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
चौकट : धडक कारवाईचे शिलेदार
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस कर्मचारी काळे, वाबळे, लोखंडे, पोकळे, मुरकुटे, धस, कोल्हे, कोहक, बरडे, महिला पोलीस अनिता निकत,राणी व्यवहारे यांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या  कारवाईचे जनतेने कौतुक केले आहे

COMMENTS