Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरात कायदा सुव्यवस्था राखा

वेळ पडली तर टवाळखोरांची धिंड काढा मंत्री भुसे आक्रमक

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पोलिस  अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी येत्या आठवड्याभरा

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे सामान्य रूग्णालय मालेगावचे होणार श्रेणीवर्धन
नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा – पालकमंत्री दादाजी भुसे
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पोलिस  अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी येत्या आठवड्याभरात टवाळखोरांना धडा शिकवून मुसक्या आवळण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी केल्यात. गेल्या महिनाभरात गंभीर गुन्हे घडले याची दखल घेत आज बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मोनिका राउत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बछाव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी शहरात रस्त्यावर पोलिसांनी दिसायला हवे यासाठी पोलिसिंग वाढविण्याच्या सूचना केल्या असून, दामिनी पथक सक्रिय करून टवाळखोरांना धडा शिकवा , तसेच अवैध धंदे तातडीने बंद करून मला शहरात शांतता हवी आहे त्यासाठी सर्वोतोपरी यंत्रणा राबविण्याच्या सूचना यावेळी भुसे यांनी केल्यात.  येत्या आठ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना केल्यात. शहरातील ब्लॅक स्पॉट शोधून कोंबिंग करून सराईत गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करण्याची सूचना यावेळी केली आहे. जे दोषी व उपद्रवी असतील त्यांची धिंड काढण्याची सूचना दिली.

COMMENTS