Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळवा तालुका गुलामगिरीतून मुक्त करा : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका क्रांतिकारकांचा आहे. गेल्या 35 वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जनतेचा विकास कमी पण त्यांच्यावर अन्या

मोजक्या मानकर्‍यांच्या उपस्थिती पाल येथे खंडोबा यात्रा
कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग
धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका क्रांतिकारकांचा आहे. गेल्या 35 वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जनतेचा विकास कमी पण त्यांच्यावर अन्यायच जास्त झाला. हा अन्याय व हुकुमशाही यापुढे मी व माझा स्वाभीमानी मतदार सहन करणार नाही. ही विधानसभा निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभीमानाची आहे. या निवडणुकीत परिवर्तनाच्या बाजूने ठामपणे उभे रहा व हा तालुका गुलामगिरतीतून मुक्त करा, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार दौर्‍या दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी घरोघरी भेटी दिल्या. नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडला. निशिकांतदादांनी त्या पूर्ण करण्यासाठी त्या कामांचा आराखडा लोकांसमोर ठेवला.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, इस्लामपूर मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन, त्याचा संपूर्ण आराखडा घेऊन मी गेली दहा वर्षे काम करतोय. सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्याची मला कल्पना आहे. माझी परंपरा समाजसेवेची आहे. माणूस उभा करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. कोट्यवधी रुपयांचे शेतकर्‍यांचे थकलेले बिल माफ करण्यात आले. मोफत वीज देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला. पाणंद रस्त्यासह अंतर्गत रस्ते व मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मी महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणला.
मला या निवडणुकीत आशीर्वाद द्या. महायुती सरकारच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या गावात, घरात रोजगाराच्या संधी देण्याचा आमचा संकल्प आहे. इस्लामपूर येथील एमआयडीसीला पुनर्जीवित करून येथे नवनवीन उद्योग आणून इथल्या तरुणांना रोजगार व आधुनिक सुविधा देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन व येथील विकासाला मी सतत बळ देईन.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इस्लामपूर एमआयडीसीला उतरती कळा
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या अकार्यक्षम आमदारांनी राज्य मंत्री मंडळात मोठी पदे भोगली. परंतू मतदार संघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षामुळे येथील एमआयडीसीला उतरती कळा लागली आहे. त्यांनी मोठ-मोठ्या कंपन्या आणून येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. पण आहे त्या कंपन्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यांनी फक्त आपले व आपल्या पै-पाहुण्यांची घरे भरण्यात तप्तरता दाखवली, असा आरोप ही निशिकांत भोसले-पाटील यांनी यावेळी केला.

COMMENTS