Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण

कोपरगाव : तालुक्यातील वारी येथे भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच तहानलेल्या वाटसरूंसाठी पाण्याचा आधार देणाऱ्या पाणपोईचा शुभारंभ रविवारी (दि.8) करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ यांच्या वतीने भरतवाडी परिसरात सलग तिसऱ्या वर्षी या मोफत पाणपोईची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, समाजाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करून स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान करण्यात आला.  भरतवाडी परिसरातील श्री रोकडोबाबा व श्री गवळी बाबा देवस्थानच्या पवित्र प्रांगणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी गावातील ज्येष्ठ समाजसेविका स्मिता काबरा, समर्पित अंगणवाडी सेविका अलका मेहरे, सारिका भड, विशाखा भालेराव, तारामती टेके व वृषाली टेके, तसेच आरोग्यदूत आशा सेविका सुषमा कपाटे, रोहिणी लोखंडे, योगिता पवार, शितल गायकवाड, सविता वाघ, रंजना भड व सुषमा वाघ यांचा त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला. राहुल (दादा) मित्र मंडळातील महिला स्वयंसेविकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
समर्पित नेतृत्वाचे उदाहरण म्हणजे नीलेश लंके; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ; पारनेर येथे महाआरोग्य यज्ञ शिबिराचे उदघाटन
राहाता येथील गर्भलिंग निदान प्रकरणी कठोर कारवाई करा

कोपरगाव : तालुक्यातील वारी येथे भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच तहानलेल्या वाटसरूंसाठी पाण्याचा आधार देणाऱ्या पाणपोईचा शुभारंभ रविवारी (दि.8) करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ यांच्या वतीने भरतवाडी परिसरात सलग तिसऱ्या वर्षी या मोफत पाणपोईची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, समाजाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करून स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान करण्यात आला.

 भरतवाडी परिसरातील श्री रोकडोबाबा व श्री गवळी बाबा देवस्थानच्या पवित्र प्रांगणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी गावातील ज्येष्ठ समाजसेविका स्मिता काबरा, समर्पित अंगणवाडी सेविका अलका मेहरे, सारिका भड, विशाखा भालेराव, तारामती टेके व वृषाली टेके, तसेच आरोग्यदूत आशा सेविका सुषमा कपाटे, रोहिणी लोखंडे, योगिता पवार, शितल गायकवाड, सविता वाघ, रंजना भड व सुषमा वाघ यांचा त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला. राहुल (दादा) मित्र मंडळातील महिला स्वयंसेविकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

COMMENTS