Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय टपाल खात्याव्दारे महिला सन्मान बचतपत्र योजना

बीड प्रतिनिधी - भारतीय टपाल खाते सुकन्या सारख्या यशस्वी योजने नंतर आता महिलांच्या आर्थिक सक्षम करण्याच्या व अधिक व्याज देण्याच्या उद्देशाने भारत

सनी देओल बेपत्ता? पठाणकोट मध्ये लागले पोस्टर्स
मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतात | LOKNews24
पाच रुपयांच्या नव्या लिंकने घातलाय धुमाकूळ

बीड प्रतिनिधी – भारतीय टपाल खाते सुकन्या सारख्या यशस्वी योजने नंतर आता महिलांच्या आर्थिक सक्षम करण्याच्या व अधिक व्याज देण्याच्या उद्देशाने भारत सरकाने भारतीय टपाल खात्याव्दारे महिला सन्मान बचतपत्र योजना हि देशातील महिलांसाठी दि. 3 एप्रिल 2023 पासून देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सुरु केली असल्याचे बीड पोस्ट ऑफीसचे डाक अधीक्षक कुंदन जाधव यांनी कळविले आहे.
महिला सन्मान बचतपत्र हे वयस्कर महिला तसेच अवयस्क मुलगी ज्यांचे वय 10 वर्षापेक्षा अधिक असेल अशा मुली वयस्कर महिलेव्दारा या बचत योजनेचा लाभ दि. 31 मार्च 2025 पर्यंत घेऊ शकतात. या योजनेत कमीत कमी 1000 रु. गुंतवणूक आणि जास्तीत जास्त 2 लाख रु. पर्यंत गुंतवणूक महिला करु शकतात. योजनेत गुंतवणूक केलेल्या तारखेपासून 2 वर्ष पूर्ण झाल्यावर हि योजना परिपकवता प्राप्त होते. त्यानंतर रक्कम काढता येईल. महिला सन्मान बचत पत्र या बचत योजनेमुळे महिला आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार असून या बचत योजनेत इतर बचत योजनेच्या तुलनेत अधिक व्याज (7.5%)  आहे. त्यमुळे बीड विभागातील सर्व वयस्क तसेच अवयसक मुलीनी या बचत योजनेचा जवळच्या पोस्टात जाऊन लाभ घ्यावा.

COMMENTS