अहमदनगर : अहमदनगरच्या आगडगाव येथे श्री जोगेश्वरी माता नवरात्र उत्सव निमित्ताने महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीदुर्गा सप्तशती पाठ सोहळ्याचे आयो

अहमदनगर : अहमदनगरच्या आगडगाव येथे श्री जोगेश्वरी माता नवरात्र उत्सव निमित्ताने महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीदुर्गा सप्तशती पाठ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा रविवारी 15 ते 23 ऑगस्ट पर्यंत चालणार असून या सप्ताहाची पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा देवाची आळंदी येथील हरिभक्त परायण प्रांजल ताई जाधव यांनी केली आहे.
या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत फक्त महिला कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडणार असून संपूर्ण सप्ताहाचे नियोजन महिलांनी केले आहे. उत्कृष्ट नियोजन महिलांनी केले असून अगदी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. कीर्तन सोहळा पार पडल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाआरती आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी केले आहे.
आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान येथे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दर रविवारी महाप्रसाद आणि महाआरतीचा कार्यक्रम केला जातो.
श्री काळभैरवनाथ देवस्थानचे भक्त थोर दानशूर राकेश कुमार यांनी यावर्षी देखील वीस टन देवस्थानला तांदूळ भेट दिला आहे. राकेश कुमार हे गेल्या अनेक वर्षांपासून देवस्थानाला तांदूळ भेट देत असतात आणि याही वर्षी त्यांनी तांदूळ भेट दिल्यामुळे मंदिर समितीने राकेश कुमार यांच्या स्वागताचे फलक मंदिर परिसरात लावले आहेत.यावेळी महिला भाविक आणि आगडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
COMMENTS