Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहेश्‍वरी समाजाकडून महेश नवमी उत्साहात साजरी      

राहुरी ः राहुरी शहरातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत 14 जून ते 16 जून दरम्यान हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला. 14 जून रोजी आपल्या महिलांनी वि

पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसची मुसंडी
प्राणायाम व ध्यान पूजा सर्वश्रेष्ठ ः स्वामी ब्रम्हचैतन्य
अखेर 53 वर्षानंतर निळवंडे पूर्णत्वास

राहुरी ः राहुरी शहरातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत 14 जून ते 16 जून दरम्यान हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला. 14 जून रोजी आपल्या महिलांनी विविध स्पर्धा आयोजीत करून मुलांच्या कला गुणांना वाव मिळण्याच्या हेतुने काम केले. 15 जून म्हणजेच महेश नवमी. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या कार्यक्रमासाठी सर्व युवांनी, किशोरी आणि महिलांनी कार्यक्रम उच्चतम व्हावा यासाठी प्रयत्न केले.
संध्याकाळी मुलांच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण, शालेय परिक्षेत, व इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे गौरव करून कौतुक करण्यात आले. महिलांच्या भजन अंताक्षरी कार्यक्रम झाले नंतर उमा महेश ची आरती सर्व समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आली तदनंतर महाप्रसाद दाळबट्टीचा आस्वाद घेतला. 16 जून रोजी युवा संघटन व जिल्हा माहेश्‍वरी सभा अशा दोन्ही संस्थांनी मिळून जिल्हा संघटनचे उपक्रम रक्तदान शिबीर आणि सेतू शिबीर आयोजित करण्यात आले त्यामध्ये 39 लोकांनी रक्तदान केले व आधार कार्ड , पॅनकार्ड श्रेणी सुधार 78 लोकांनी केले तसेच काही बांधवांनी ज्यांचे ऑनलाईन रेशन कार्ड झाले असल्याने आभा आणि आयुष्मान भारत कार्ड नवीन करून घेतले. सर्व समाज बांधवांचा व महिलांचा महेश नवमी निमित्ताने 100 टक्के सहभाग लाभला याबद्दल सकल राज स्थानी समाज व माहेश्‍वरी युवा, व महिला मंडळ आपण सर्वांचे आभार व्यक्त करत आहे.

COMMENTS