Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंविरोधात महायुतीचे आज शक्तीप्रदर्शन

’चोर मचाए शोर’च्या नाराने देणार प्रतिउत्तर

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा भव्य मोर्चा आज शनिवारी मुंबई महापालिकेवर धडकणार आहे. यासाठी ठाकरे गट जोरदार शक्तीप्र

जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात रचले 9 थर
नगर मनपाचा कर्मचारी खेळणार… ’कोण होणार करोडपती’
यंदा देशात होणार 103 टक्के पाऊस | DAINIK LOKMNTHAN

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा भव्य मोर्चा आज शनिवारी मुंबई महापालिकेवर धडकणार आहे. यासाठी ठाकरे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची ही नांदी असल्याचे बोलले जात असतांनाच, महायुती ठाकरे गटाविरोधात आंदोलन करत, शक्तप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप आणि शिेंदे गटाच्या वतीने ठाकरे गटाच्या मोर्चाला प्रतिउत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. ’चोर मचाए शोर’ असा नारा देत आदित्य ठाकरेंच्या या मोर्चाला भाजपा शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची रणनीती या माध्यमातून महायुतीने आखली आहे. भाजपच्या वतीने नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातूनच शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंवर मात करण्यासाठी महायुती रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. मागील 25 वर्षात मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्ष राहिले आहे. या माध्यमातून शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्याची पोलखोल महायुती या मोर्चाच्या माध्यमातून करणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आमदार आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकावर काढण्यात येणार्‍या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्वच पदाधिकारी कामाला लागले आहे. उद्धव ठाकरेंनी या संदर्भात अनेक बैठका घेतल्या आहेत. या मोर्चाला भव्य करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा मोर्चा मुसळधार पावसासारखाच मुसळधार होईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी आधीच केला होता. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार्‍या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आधी ठरलेल्या मार्गाला परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानुसार पोलिसांशी चर्चा केल्यानंतर या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

COMMENTS