Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

अहमदनगर प्रतिनिधी - शेतकर्‍यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकर्‍या

अजित पवारांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले
विरोधकांचे चक्रव्यूह भेदून दाखवले : मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर प्रतिनिधी – शेतकर्‍यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी केली आहे.

सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत, त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकर्‍यांवर अतिवृष्टी व पूर परिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, असे आदेश सिंघल यांनी दिले आहेत.

COMMENTS