महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार जितके मजबूत होताना दिसत आहे तितकेच भाजपाचे आरोप आणि आक्रमकता देखील वाढताना दिसते आहे. भाजपच्या या आक्रमणाला केंद्र
महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार जितके मजबूत होताना दिसत आहे तितकेच भाजपाचे आरोप आणि आक्रमकता देखील वाढताना दिसते आहे. भाजपच्या या आक्रमणाला केंद्रीय तपास यंत्रणांची जोड असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट सभागृहात केला. ज्या वेळी मुख्यमंत्री यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षाचे नाव न घेता शिखंडी चा उल्लेख करून मर्दासारखे अंगावर या असे वक्तव्य करीत भाजपाला एक प्रकारे आव्हानात्मक भाषेतून उत्तर दिले. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण हे आक्रमक ते पेक्षा भावनिक बाजूने झुकणाऱ्या अधिक होते, असे म्हणावे लागेल. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना आरोप केला की सरकार विरोधी पक्षाच्या कोणत्याही आरोपांना उत्तर देऊ शकले नाही. तरी या अधिवेशनाचा समारोप होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी केलेले जवळपास तासाभराची भाषण हे कुटुंबाला टारगेट करून वैयक्तिक बदनामी करण्याच्या अनुषंगाने विरोधी पक्ष राजकारण करीत आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी लगावला. एका बाजूला महा विकास आघाडीतील सत्ताधारी तीन पक्षांची आघाडी आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा सामना सभागृहात हातांना मात्र सत्ताधारी आघाडी पेक्षा विरोधी पक्ष अधिक अग्रेसर किंवा आक्रमक दिसून येतो असेच आजपर्यंतचे चित्र राहिले आहेत. वास्तविक सत्ताधारी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वच नेते हे अनुभवी आणि तितकेच मुत्सद्दी आहेत. परंतु सरकार पक्षातील विविध नेत्यांवर जो दबाव येतो आहे, किंवा जे आरोप होत आहेत किंवा जी कारवाई होते आहे, त्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढतानाचे चित्र मात्र जनतेसमोर तेवढे सशक्तपणे जात नाही किंवा दिसत नाही. याचा एक दुसरा अर्थ असा होतो की महा विकास आघाडीतील घटक पक्ष यांची आघाडी अगदी मजबूत असली तरीही सत्ता संघर्षाच्या या लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात तुटून पडण्याची सभागृहात 3 जी बाब दिसायला हवी ती मात्र तितक्या प्रकर्षाने दिसत नाही याचा अर्थ सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या सोबत राहूनही एकमेकांचं खच्चीकरण करू पाहत आहेत का? असाही प्रश्न अनुषंगाने उभा राहतो. परंतु भाजप शिखरावर त्याने जर ला जायचे असेल तर सत्ताधारी महा विकास आघाडीला सर्वप्रथम मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या पद्धतीने अदलाबदल किंवा बदल्यांचे सत्र सर्वप्रथम राबवावे लागेल. कनक प्रशासनात संघाची माणसं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मंत्रालयात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींची फर्स्ट हँड माहिती जी आहे ती संघाला आणि पर्यायाने भाजपला जाते; त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री किंवा नेते यांच्या विषयीचे धोरण आणि रणनीती किंवा त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी नव्या क्लृप्त्या काय कराव्या यासंदर्भात भाजप आपली रणनीती आखत असतो. शिवसेनेशी भाजपाचा संघर्ष आता केवळ राजकीय नसून तो सांस्कृतिक पातळीवर देखील अवतरला आहे असे दृश्य तिथीनुसारच्या शिवजयंतीला साजरी करण्यास शिवसेनेने केलेली उपेक्षा ही संघाला अधिक बोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपाचे आक्रमण काहीसे शांत होताना दिसते आहे कारण आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना त्यांनी कारवाई च्या कक्षेत आणलेले आहे. त्यामुळे भाजपच्या आरोपांचा मोर्चा शिवसेनेकडे पळाला परंतु थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पर्यंत येऊन पोहोचेल असा फारसा विचार कोणीही केलेला नव्हता. परंतु वस्तुस्थिती तशी झाली. भाजपा विरोधात लढताना महा विकास आघाडीला आता संग जिना अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण पदांवरून बाजूला केल्याशिवाय सत्ता संचालन सहज होणार नाही आणि कोणतीही माहिती विरोधी पक्षाकडे गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्वप्रथम सत्ताधारी महा विकास आघाडीने प्रशासकीय भूमिका ठरवतांना संघाशी संबंधित अधिकाऱ्यांकडे महतपूर्ण पदे राहणार नाही, याची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे.
COMMENTS