इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीत असणारा अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. त्याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीत दिसला आहे. आगामी विधान परिषद न
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीत असणारा अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. त्याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीत दिसला आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला त्याचा फटका बसणार असल्याचे मत नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
ते पेठ (ता. वाळवा) येथे नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलनात सत्कार प्रसंगी आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.
महाडीक म्हणाले, राज्यसभेचे मतदान करताना आमदारांनी आपले मतदान आपल्या पक्षाच्या पक्षप्रतोद यांना मत दाखवून नंतर मतदान करायचे असते. असे असूनही महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकित तर गुप्त पध्दतीने मतदान असते. महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांच्यातील घटक पक्षांचा असंतोष उफाळून आला आहे. सोबत असणारे सहयोगी आमदार, लहान पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप केले आहेत. घोडेबाजार म्हणता आम्ही घोडे आहोत का? शेतकर्यांना भाव मिळाला पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. यातूनच महाविकास आघाडीत असणारी खितपत दिसून येत आहे. त्याचा परिणाम या राज्यसभेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. महाविकास आघाडीला विधान परिषदेत त्याचा मोठा फटका बसणार आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच ते सहा जागा निवडून येतीलच. थोर महाडिक बांधवांची शिकवणीची ही शिदोरी घेऊन आम्ही पुढची पिढी सर्व बंधू पुढे काम करत आहोत. सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू मानत काम केले आहे. सामाजिक, कृषी क्षेत्रात, युवकांचे, महिलांचे संघटन या कामाची पोच पावती म्हणून भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली. भाजपचे ऋण या आयुष्यात फिटणार नाहीत. राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात येणार्या सर्व निवणुकांची जबाबदारी माझ्यावर आहे. सर्व निवडणुका भाजप अधिकृत चिन्हावर लढवणार. जिल्हा परिषद, पंचायत समिती यात नव्याने भाजपची ताकद, नवीन युवकांचे संघटन करून जुन्या लोकांना एकत्रित करून भाजपची ताकद वाढवण्याचे काम करू. माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडवणीस, चंद्रकांत पाटील यांना देत आहे. संख्याबळ कमी असतानाही उमेदवारी घोषित केली होती. तरीही मला विश्वास होता की फडवणीस यांनी संख्या बळ असल्याशिवाय मला उमेदवरी देणार नाहीत. त्यामुळे मतदानाचे गणित बसवणे, त्याची बेरीज करणे याचे प्रॅक्टिस फडवणीस व चंद्रकांत पाटील यांनी घेतले. त्यामुळे पक्षाचा विजय झाला.
आ. लक्ष्मणराव जगताप, मुक्तताई टिळक हे रुग्णालयात अतिदक्षता विभागात असतानाही भारतीय जनता पार्टीची निष्ठा असल्याने आपले सदस्य निवडून येण्यासाठी त्यांनी अॅम्ब्युलन्समधून मुंबईला येऊन मतदान केले. त्यामुळे मी निवडून आलो आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचे संपूर्ण श्रेय भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडवणीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, गिरिष महाजन गेले आठ ते दहा दिवस प्रचंड कष्ट घेतले गेले. माझे संपूर्ण कुटुंब 15 दिवस मुंबईमध्ये तळ ठोकून होते. संपूर्ण महाराष्ट्र आमदारांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीची रणनीती करत होते. याचा मला सार्थ अभिमान आहे. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडिक, सी. बी. पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी राजांची भूमिका वेगळी होती. समाज बांधणी करणाचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी अपक्षच निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. शिवसेनेत प्रवेश केला तरच उमेदवारी मिळणार होती. त्यांची भूमिका शिवसेनेला मान्य नव्हती, त्यामुळे त्याना ही संधी मिळाली नाही.
COMMENTS