Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 खामगावात महाविकास आघाडी फुटली

शिवेसेना स्वबळावर कृ.उ.स.ची निवडूक लढवणार

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समिती ही सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार

काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे निधन
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
बाप तुरुंगात-आईचा मृत्यू; दोन चिमुरडी बालके अनाथ

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समिती ही सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या निवडणूक सुरू आहे.  यामध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. तर निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी अंतिम मुदत होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दोन गट, भाजप, शिवसेना यांच्यात चौरंगी लढत होणार होती. महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शिवसेनेला (उबाठा) एक जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज महाविकास आघाडीला विश्वासात न घेता कालपर्यंत सर्व अर्ज विड्रॉल करून घेतले. ज्या जागेचे आश्वासन दिले होते त्या जागेसाठी आश्वासन दिले होते, त्या जागेसाठी महाविकास आघाडीने स्थान दिले नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हे स्वबळावर लढवणार आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत पाहायला मिळणार आहे

COMMENTS