Homeताज्या बातम्यासंपादकीय

महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 

संविधान सन्मान महासभा, मुंबईच्या शिवाजी पार्कवर लाखोंच्या उपस्थितीत पार पडली. संविधान सन्मान महासभा ही राजकीय सभा नसून संविधानाच्या सन्मानार्थ या

देणारे याचक का बनले!
महाराष्ट्र पूर्ववत राहू द्या !
तापमानाची होरपळ !

संविधान सन्मान महासभा, मुंबईच्या शिवाजी पार्कवर लाखोंच्या उपस्थितीत पार पडली. संविधान सन्मान महासभा ही राजकीय सभा नसून संविधानाच्या सन्मानार्थ या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते; त्यामुळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या संविधानाच्या मूल्यांसाठी लढत असल्याने त्यांना या महासभेला पाचारण करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते! राहुल गांधी यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला असला तरी, कार्य बाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून नाना पटोले यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र, यानिमित्ताने एक प्रश्न उभा राहतो की, संविधान सन्मान महासभेच्या अनुषंगाने संविधानाच्या अनुषंगाने विचार करणारी किंवा त्यावर विचार मांडणारी ही महासभा असताना, केवळ वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य उपस्थित वक्त्यांमध्ये अधिक होते. त्यामुळे एका अर्थाने वंचित बहुजन आघाडीची ही महासभा होती, असे म्हणण्यास हरकत नाही. एक मात्र खरे की, या सभेमध्ये ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय चिंतनशील असे भाषण केले. ज्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण हे मद्रास प्रांताच्या दोराईस्वामी या खटल्यात अडकून पडले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण वारंवार हा दावा करतो की मराठा समाजाला आरक्षण कसे दिले जाईल, हे मलाच माहित आहे! परंतु त्यासाठी सर्व काही मी आता सांगणार नाही, असा थेट दावा त्यांनी केला. एक मात्र नक्की की, त्यांनी या महासभेत बोलताना, आगामी काळामध्ये संविधान हा कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट नमूद केले. सविधान बदलण्याची भाषा करणारे, नवे संविधान कसे असावे, यासंदर्भात मात्र काहीही वाच्यता करत नाहीत. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये विषमतेचा कळस असलेला आणि मानवी मूल्य नाकारणाऱ्या मनुस्मृतीचा कायदा पुन्हा लागू करण्याचा त्यांचा इरादा दिसतो, अशी थेट टीका ऍड.आंबेडकर यांनी केली. संविधान जर जुने झाले असेल तर ते नक्की बदलायला हवे, त्याला आमचा आक्षेप नाही; पण नवे संविधान येताना त्यावर चर्चा करणारे कोण असणार, त्याचा ड्राफ्टिंग करणारे कोण असणार, यासंदर्भात काही स्पष्टता जेव्हा मिळत नाही, तेव्हा, त्याचा अर्थ देशामध्ये प्रस्थापित मनुवादी व्यवस्था लागू करण्याचा तो एक डाव आहे! यामागे त्यांनी संविधानवादी शक्तींना एकत्र येण्याचे आव्हान करून, संविधान वाचविण्यासाठी या सगळ्यांनी एका मंचावर येण्याची गरज प्रतिपादन केली. हा एक महत्त्वपूर्ण भाग या महासभेमध्ये त्यांनी चर्चेला आणला. अर्थात, सविधान सन्मान महासभा यामध्ये ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण जर वगळले, तर जवळपास बहुतेक वक्तांचे भाषण हे राजकीय किंबहुना वंचित बहुजन आघाडीचे प्रचार करणारेच त्या ठिकाणी झाल्याचे दिसते. परंतु, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय वाच्यता किंवा राजकीय भाष्य या महासभेच्या भाषणात केलं नाही; हा त्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एक मात्र खरे की, आगामी काळात देशामध्ये कुठल्यातरी ठिकाणी नरसंहार घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अर्थात, अशा प्रकारची भीती केवळ भविष्यवाणी नव्हे, तर यामागे आजूबाजूला सुरू असणाऱ्या चर्चा, अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या गुप्तवार्ता यामध्येही याचे संकेत मिळतात, असेही त्यांनी म्हटले. सर्वसामान्य जनतेने अशा प्रकारच्या हिंसक वातावरणाला थारा देऊ नये, हे त्यांचे आवाहन आणि त्याचबरोबर जे नेते धर्माच्या नावाखाली असा नरसंहार घडवण्याचा प्रयत्न करणार, त्या नेत्यांनी आधी त्यांच्या मुलांना मैदानात उतरवावं, अशी थेट आव्हानात्मक भाषा करून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी या महासभेच्या निमित्ताने केले. संविधानाची मूल्य नष्ट करणाऱ्यांना एक प्रकारे ठळकपणे आव्हान दिले आहे.

COMMENTS