Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणप्रश्‍नी महाराष्ट्र पिंजून काढणार ः मनोज जरांगे

14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत जाहीर सभा

जालना/प्रतिनिधी ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्यांचा अल्टीमेटम दिलेले मनोज जरांगे यांनी आरक्षणप्रश्‍नी संपूर्ण महाराष्

मनोज जरांगे बॅकफूटवर ; शिंदे, फडणवीसांची मागितली माफी
मनोज जरांगे राज्यभर करणार रास्ता रोको
मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना

जालना/प्रतिनिधी ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्यांचा अल्टीमेटम दिलेले मनोज जरांगे यांनी आरक्षणप्रश्‍नी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून, त्यानंतर येत्या 14 येत्या 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच साखळी उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळूनच घ्यायचे, यावर एक मताने ठराव पारित करण्यात आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ही या बैठकीदरम्यान घेण्यात आली. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सरकारने वेळ मागितला, वेळ देणे अपेक्षित होते म्हणून दिला. सरकारने एक महिना मागितला होता आम्ही 10 दिवस जास्त दिले आहेत. सरकारला दिलेली मुदत 14 तारखेला पूर्ण होत आहे. त्यापुढे 10 जास्तीचे दिले आहेत. त्या काळात त्यांनी आरक्षण द्यावे. यासाठी 14 तारखेला देखील येथे त्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे सर्व कार्यक्रम शांततेत होणार आहेत, असेही जरांगे म्हणाले.

COMMENTS