Homeताज्या बातम्यासंपादकीय

शांततेकडे महाराष्ट्र लवकरच !

 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्या संदर्भात उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात भाजपाचे तीन उमेदवार आधीच ठरले. त्यांच्या म

स्वराज्य आणि समतेसाठी वर्णवर्चस्वाला सुरूंग लावणारे छत्रपती ! 
उदयनराजेंचे आंदोलन श्रेयासाठी ? 
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….

 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्या संदर्भात उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात भाजपाचे तीन उमेदवार आधीच ठरले. त्यांच्या मित्र पक्षांचे आणखी दोन उमेदवार आज-उद्या मध्ये ठरतीलच. त्याचबरोबर महाराष्ट्राचे तापमान ४० पार मार्चमध्येच होताना दिसत आहे. अतिशय दोलाईमान असणार तापमान, राज्यामध्ये कुठे पाऊस, तर कुठे ढगाळ वातावरण तर, कुठे चाळीशी पार असणार तापमान, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकीय आणि भौगोलिक जीवनाला पुन्हा  नव्याने चर्चेत आणत आहेत. तसेच, महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण देखील गेल्या काही महिन्यांपासून अतिशय हिंसक पातळीवर गेलेले आहे. राजकारणातील स्पर्धेतून झालेल्या खून खराबाने महाराष्ट्राला अवघ घेरले आहे. मात्र, त्या संदर्भात सभागृहात कोणताही राजकीय पक्ष भूमिका घेताना दिसत नाही. विरोधी पक्ष म्हणवणारे तर नुसतेच मिठाच्या गुळण्या तोंडात घेऊन बसल्यासारखे वातावरण आहे. कोणतीही वैचारिक भूमिका सभागृहात मांडली जात नाही. वैचारिक भाषणे होत नाही. नुसता गोंधळ हा सभागृहाचा स्थायीभाव बनतो आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण जे आजपर्यंत प्रकल्भतेचे राज्याने पाहिलेले आहे. अनेक नेत्यांची चर्चेतील भाषणे ऐकून महाराष्ट्र नव्या विचारांनी किंवा विचार करायला लावणारे, अशा पद्धतीचे राजकारण समजून घेत असतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणालाही हिंसाचाराची कीड लागली आहे. हा हिंसाचार सर्वपक्षीय नेत्यांनी बोकळवला आहे. कारण, सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राजकारणातले डावपेच आणि त्यांचे राजकारण हे सारख्याच पातळीवर हिंसक आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातील लोकप्रतिनिधी राजकीय स्पर्धेपायी विरोधी नेत्याला किंबहुना आपल्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेतृत्वाला शह देण्यासाठी आपल्या पदरी गुंड बाळगत असतो. हेच सर्वपक्षीय राजकीय नेते करतात आणि हेच राजकीय नेते आपल्या गुंडांच्या बळावर निवडणुका लढतात.  आपल्या राजकारणासाठीही त्यांच्या माध्यमातूनच पैसा गोळा करतात. हे महाराष्ट्राने आता जाणून घेतले आहे. परंतु, ही परिस्थिती केवळ चिघळत ठेवणं हे महाराष्ट्रात कोणाच्याही भल्याचे नाही. ही परिस्थिती वेळीच आवर घालण्याची आहे. परंतु त्यावर विरोधी पक्षातले कोणतेही नेते सभागृहात भूमिका घेत नाही. जेव्हा, सत्ताधारी पक्ष काही चुका करत असेल तर, विरोधी पक्षाने त्या आपल्या भाषणातून आपल्या विचार मंथनातून समोर आणल्या पाहिजे. परंतु, अशा प्रकारचं राजकारण विरोधी पक्ष म्हणणारे आजचे राजकीय पक्ष हे देखील सत्तेत असताना, अशा बाबींना ते बळ देत आले आहेत. त्यामुळे, आज हे उघड होऊ नये, त्यांना त्या विरोधात भूमिका घ्यावी असं वाटत नाही. कारण, त्यांच्या राजकारणाचे सूत्रही अशाच पद्धतीचे आहे. राज्याचे हिंसक वातावरण हे टिकून राहावे ही भूमिकाच मुळातून ग्रामीण भागातून आलेल्या लोकप्रतिनिधींची आता अधिक वाढताना दिसते आहे. यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच नियंत्रण मिळवतील. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या पातळीवर गेलेले आहे, हे त्यांनी जुन्या राजकीय नेत्यांनीही अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात केले आहे, हे अनेक प्रकरणातून त्यांनी महाराष्ट्रासमोर येऊ दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला यापूर्वी सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी कशा पद्धतीने घडवला आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या समोर आणलेले आहे. त्यामुळे, आता त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची भूमिका आणि इच्छाशक्ती ही त्यांची आहे. त्यामुळे ते नक्कीच महाराष्ट्राला पुन्हा शांततेच्या भूमिकेकडे घेऊन जातील.

COMMENTS