Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ; सहा महिन्यात 1 लाख 13 हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्रात होणारी परकीय गुंतवणूक अर्थात एफडीआय इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून गुंतवणूकदारांचा सर्वाधिक विश्‍वास महाराष्ट्रात असून

2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील
कोरोनाचे सव्वा दोन लाख डोस शिल्लक I LOKNews24
झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत ! | LOKNews24

मुंबई : महाराष्ट्रात होणारी परकीय गुंतवणूक अर्थात एफडीआय इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून गुंतवणूकदारांचा सर्वाधिक विश्‍वास महाराष्ट्रात असून, ही अभिमानाची बाब आहे, त्यासोबत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक्सवर ट्विट करून दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2024- 25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीत आकडेवारी जाहीर केली असून, यात महाराष्ट्र अव्वल ठरल्याचा दावा केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव घेत राज्याचे अभिनंदन देखील केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्रीफडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आता महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देखील दिली आहे. संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो, असा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला असताना कर्नाटक दुसर्‍या, गुजरात तिसर्‍या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.

मागील पाच वर्षांतील गुंतवूणक
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी

COMMENTS